आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Prime Minister Modi Is Behaving Like An Alcoholic, Prakash Ambedkar's Tongue Slipped; Allegations Were Also Made Against The State Government

टीकास्त्र:पंतप्रधान मोदी दारुड्यासारखे वागत आहेत, टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली; राज्य सरकारवरही केला आरोप

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत राज्य सरकारने घेतला आखडता हात, प्रकाश आंबेडकर यांचा पाहणी दौऱ्यावेळी आरोप

राज्यात तीन पायांचे सरकार असून त्यामधील एक किंवा दोन पाय कोणत्याही पद्धतीची मदत जाहीर न करण्याबाबत तिसऱ्या पायावर दबाव टाकत आहेत. त्यांना साखर कारखान्यांना अनुदान जाहीर करायचे असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत हात आखडता घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

आंबेडकर यांनी मंगळवारी (दि. २०) सांगवी (ता. अक्कलकोट) यासह परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्राकडून मदत येण्याची वाट न पाहता राज्य शासनाने आपली तिजोरी शेतकऱ्यांसाठी खुली करावी. कर स्वरूपात जमा झालेल्या पैशावर सर्वसामान्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्वरीत शेतकरी, आपत्तीमध्ये अडकलेल्या कुटुंबीयांना खावटी अनुदान अंतर्गत तातडीने पाच हजार रुपयांची प्राथमिक मदत द्यावी.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. सत्ता गेल्याची कल्पना नसल्यासारखा त्यांचा कारभार सुरू असल्याची टोला आंबेडकर यांनी लगावला.

पंतप्रधानांबाबत बोलताना जीभ घसरली...

पंतप्रधान मोदी दारुड्यासारखे वागत आहेत. देशाला कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या नवरत्नांमधील विमान, रेल्वे, आइल कंपन्या कोरोनाची कारणे पुढे करीत विक्रीला काढली आहेत. दारुड्या जवळचे सगळे संपले की तो घरातील वस्तू विकतो, नंतर घरच विकतो, तशी अवस्था मोदींची झाल्याची टीका आंबेडकर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...