आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रनिकेतनच्या 300 विद्यार्थ्यांना प्लेसमेंटने संधी:‎प्राचार्य हुनसीमरद यांची‎ माहिती, दहावीच्या‎ विद्यार्थ्यांचे प्रबोधन‎

सोलापूर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय तंत्रनिकेतनमधील वेगवेगळ्या‎ शाखांतील ३०० विद्यार्थ्यांची निवड‎ नोकरीसाठी वेगवेगळ्या नामवंत‎ कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटद्वारे करण्यात‎ आली. दहावीनंतर तीन वर्षांचा अभियांत्रिकी‎ डिप्लोमा केल्यानंतर मुला-मुलींना‎ नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे‎ प्राचार्य प्रा. सोमनाथ हुनसीमरद यांनी‎ सांगितले.‎ तज्ञ प्राध्यापकांकडून दहावीतील‎ विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.‎ तंत्रशिक्षण संचालनालय, राज्य तंत्रशिक्षण‎ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट‎ प्रोग्राम उपक्रम सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात‎ आला.

या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील‎ दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना‎ अभियांत्रिकी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या‎ संधी, दहावीनंतर अभियांत्रिकी डिप्लोमा‎ प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं,‎ महाराष्ट्र व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या‎ वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, शासकीय‎ तंत्रनिकेतन, सोलापूर व जिल्ह्यातील इतर‎ तंत्रनिकेतनाबाबत तपशीलवार माहिती‎ विद्यार्थ्यांना देण्यात आली.‎

तंत्रनिकेतनमधील सोयींचा‎ विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा‎ मुस्लिम, जैन, बौद्ध, शिख, पारशी व‎ खिश्चन या अल्पसंख्याक‎ समाजातील विद्यार्थी व‎ विद्यार्थिनींसाठी शासकीय‎ तंत्रनिकेतनात दोन स्वतंत्र शाखा‎ उपलब्ध आहेत. संस्थेत मुलांसाठी‎ स्वतंत्र वसतिगृह आणि मुलींसाठी‎ एक स्वतंत्र वसतिगृह आणि‎ अल्पसंख्यांक विद्यार्थिनींसाठी एक‎ स्वतंत्र वसतिगृह आहे. या संधीचा‎ फायदा घ्यावा, असे आवाहनही‎ प्राचार्य हुनसीमरद केले.

बातम्या आणखी आहेत...