आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढाकार:कोरोना विषाणूच्या लसीकरिता स्वतःचे जीवन अर्पण करण्यासाठी कैदी आला पुढे, पॅराल वर बाहेर आल्याने प्रशासनाकडे केली मागणी

माढा (संदीप शिंदे)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दरम्यान कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सरकार अन् प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना लस अथवा ठोस उपाय सापडलेला नाही. जगभरात माकडाला लस देऊन त्यांच्यावर प्रयोग घेतले जात आहेत. दरम्यान आता कोरोनाच्या लसीसाठी स्वतःचे जीवन अर्पण करण्यासाठी एक कैदी पुढे आला आहे. होय हे खरं आहे. तशी लेखी मागणी त्याने तहसीलदार राजेश चव्हाण यांची भेट घेऊन मराठी व हिंदी भाषेत दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्हाधिकारी यांना देखील कैद्याने निवेदन पाठवले आहे. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावचे रहिवासी असलेल्या गणेश हनुमंत घुगे असे त्या कैद्याचे नाव आहे.

गणेश घुगे हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असुन सध्या तो कोरोना पॅरोलवर बाहेर आला आहे. कोरोना विषाणूच्या लस संशोधनाच्या कामासाठी जगभरात माकडासह अन्य प्राण्यांचा वापर केला जात आहे. दरम्यान कोरोनाच्या आजारावर उपचार संशोधनासाठी माझे शरीर मी स्वच्छेने आणि अत्यानंदाने देण्यास तयार असल्याचे नमुद केले. जर शासनामार्फत अशी संधी मिळाली तर मी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मी समजेल. देशासाठी समाज हितासाठी माझे जीवन उपयोगी यावे, असे मला प्रकर्षाने वाटते असे घुगे यांने प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाचे संकट मानव जातीवर ओढावलेले आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी कोरोना योद्धा म्हणुन मला स्वतःचे प्राण देशासाठी अर्पण करण्यासाठी मी स्वपुढाकाराने पुढे आलो आहे. प्राण्याचे लसी संदर्भात प्रयोग करण्यासाठी जीव जात असताना मी गहिवरून पुढे आलो आहे. - गणेश घुगे, शिक्षा भोगत असलेला कैदी 

आज गणेश घुगे यांनी माझी भेट घेऊन निवेदन दिलेले आहे. स्वतःचे शरीर कोरोना उपचार संशोधन देण्यासाठी तयार असल्याचे निवेदनात म्हटले असुन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवणार आहे. -राजेश चव्हाण, तहसीलदार माढा

बातम्या आणखी आहेत...