आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अक्कलकोट मार्गावर खासगी बस उलटून चालकाचा मृत्यू, सहा जखमी

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने येणारी खासगी प्रवासी वाहतूक बस लिंबीचिंचोळी उड्डाणपुलावर उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमाराला घडला. मोहंमद नासिर अहमद (५३, रा. गुलबर्गा) या बसचालकाचा मृत्यू झाला, तर निंगम्मा पुजारी (५४, रायचूर), रुकय्याबेगम म. गफूर वेग (७७, मुंबई), अमरीश कोडी (३७, चिंचोळी, गुलबर्गा), सतीशकुमार (३५, गोरमेटकल, यादगीर), आप्पाराव कटरे (६५, खजुरगी, आळंद), अनिल राठोड (२२ होळीताळ तांडा, शहापूर यादगीर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही खासगी बस अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने येत होती.

बातम्या आणखी आहेत...