आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासण-उत्सव आनंदात आणि एकोप्याने साजरे व्हावेत, शहरातील शांतता टिकून राहावी, समाजात अशांती आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटकांना रोखता यावे, यासाठी पोलिस यंत्रणा खबरदारी घेत आहे. येत्या काळात विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शहरातून जल्लोषात मिरवणुका निघतील. रमजान महिना सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना आणि नियोजन करण्यात येत आहे. शहरातील मिरवणूक मार्ग आणि मोक्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असणार आहे.
येत्या काळात हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आदी सण-उत्सव आहेत. स्थानिक दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दोन ते तीन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, होमगार्ड दलाचे जवान यांचा वाढीव बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही, फिक्स पॉइंट, गस्त पथक याचे नियोजन केले आहे. सजगता बाळगून प्रत्येक घटना घडामोडींवर पोलिस बारीक लक्ष ठेवत आहेत.
सार्वजनिकठिकाणी फलक,झेंडे लावण्यासाठीमहापालिका,पोलिसप्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना फलक, झेंडे लावल्यास ते हटवले जातील. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीची मागणी केली आहे. शांतता कमिटी बैठका, पायी गस्त, फिक्स पॉइंट नेमले आहेत. पोलिसांची मदत लागल्यास पोलिस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त किंवा आमच्याकडेही संपर्क करू शकता. काही माहितीही देऊ शकता.’’ विजय कबाडे, पोलिस उपायुक्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.