आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूत दरवाढ आणि महापालिकेच्या ताेकड्या सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमागधारक संघाने साेमवारी एक दिवसाच्या उत्पादन बंदची हाक दिली हाेती. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अक्कलकाेट रस्ता एमआयडीसीसह नागरी वसाहतीतल्या कारखान्यांतील यंत्रमागांची धडधड बंद हाेती. सुमारे साडेपाच काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत माकपने कामगारांना भरपाई देण्याची मागणी केली. मनसेप्रणीत कामगार संघटनेने मात्र कारखानदारांना पाठिंबा दिला.
संघाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना भेटून निवेदन दिले. कापसाच्या निर्यातीवर निर्बंध नाही, हमीभावापेक्षा जादा दराने खरेदी झाली. व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली. त्याचा थेट परिणाम सूत उत्पादनावर झाला. सुताचे दर वाढले. यंत्रमागधारक अडचणीत आले. या प्रकारात शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, मार्ग काढावा, असे कारखानदार म्हणाले. यावेळी संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, उपाध्यक्ष बसवराज बंडा, सचिव राजू राठी, खजिनदार अंबादास बिंगी आदी उपस्थित हाेते. याच शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटून निवेदन दिले. रस्ते, पाणी, पथदिव्यांचा प्रश्न मांडला. सर्व प्रश्नांवर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.