आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड:दारूबंदी न्यायालयात खटला आल्यादिवशीच निकाल, 75 हजार रुपये दंड

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दारूबंदी न्यायालयात खटला आल्या दिवशीच निकाल देत बेकायदा मद्यपानप्रकरणी सहा जणांना एकूण ५० हजार रुपयांचा दंड झाला. यात हाॅटेलचालक व चार मद्यपींचा समावेश आहे. हाॅटेलचालकाला २५ हजार रुपये दंड झाला, तर पाच मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड झाला. हैदराबाद रोडवरील हॉटेल मिलन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला होता.

तिथे अवैधरीत्या दारू पित बसलेल्यांना व हॉटेल चालकास अटक करून ताब्यात घेतले होते. एका दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून १०५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक बिराजदार व जवान चेतन व्हनगुंटी, गजानन ढब्बे, प्रियंका कुटे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...