आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वीस वर्षांपासून मार्डी गावात राष्ट्रवादी भाजपची आघाडी आहे. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुवर्णा झाडे यांनी वरिष्ठांचा आदेश धुडकावला आहे. आमदार यशवंत माने यांनीही त्यांना सांगितले तरी त्या निवडणुकीत उभ्या आहेत. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोघांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिला आहे.
मार्डी येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी युती प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार व राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे यांनी एकत्र येऊन केलेल्या मार्डी ग्रामविकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ साठे यांच्या हस्ते केला. यावेळी ते बोलत होते. काशीनाथ कदम यांनी प्रास्तविक केले. पांडुरंग शेणमारे यांनी सूत्रसंचालन केले.
राजकारण म्हणजे गंमत नाही राजकारण म्हणजे गंमत नव्हे, आलं की लगेच पदं मिळावी वाटतात. पण ते तेवढे सोपे नसल्याचे सांगून साठे म्हणाले, गेल्या वीस वर्षांपासून मार्तंडे-पवार एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवतात.
गावाच्या विकासात गटबाजीचा अडसर नको या भूमिकेतून आपण या युतीला होकार दिला आहे. माजी सरपंच मार्तंडे म्हणाले, गावाचा विकास समोर ठेवून आम्ही गटतट बाजूला ठेवून एकत्रित आलो आहोत. पण काही लोकांच्या महत्त्वकांक्षेमुळे निवडणूक लागली आहे. शहाजी पवार म्हणाले, संघर्षामुळे कधीच विकास होत नाही, हे लक्षात आल्यामुळे आम्ही पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. कुटुंब एकमुखी असेल तरच कुटुंबाचा विकास होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.