आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मिळकतीचे प्राॅपर्टी कार्ड आणि दप्तरी हुकूम नागरिकांना आॅनलाइन मिळणार आहे. तेही अवघ्या १० मिनिटांत मिळणे शक्य होणार आहे. तशी सोय महापालिकेने संकेतस्थळावर केली आहे. कोणाचेही प्राॅपर्टी कार्ड व हुकूम कोणालाही मिळवता येते. त्यासाठी आॅनलाइन अर्ज करून दहा मिनिटात डाऊनलोड करता येणार आहे. दोन्हीसाठी प्रत्येकी ११० रुपये शुल्क असेल. अन्य सेवा मोफत आहेत.
शहरातील ६२ पेठ पैकी शहरातील ३० पेठांची माहिती महापालिकेने स्कॅनिंग करून संकेतस्थळावर अपलोड केली आहे. इतर पेठांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आता ३० पेठांची माहिती मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाइन सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.नागरिकांना स्वत:लाच कराचा अंदाज घेता येईल नागरिकांना स्वत:च्या घराची कर आकारणी स्वत: पाहता येईल. त्यासाठी सेल्फ टॅक्स येथे जाऊन योग्य माहिती भरल्यास कर किती याची माहिती मिळते.
बांधकामांविषयी तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार
अनधिकृत बांधकामाची माहिती नागरिकांनी दिल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवता येणार आहे. त्याबाबत त्यांनी त्यानुसार माहिती भरून देणे आवश्यक आहे. सबंधित अधिकाऱ्याशिवाय इतरांना नाव कळणार नाही. त्यांनी पाठवलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या उत्पन्नात भर पडले तर तक्रारदारांस महापालिका बक्षीस देईल.
कार्यालयात येण्याची गरज नाही, ऑनलाइन सेवा घरबसल्या घ्या
आॅनलाइनवर प्रापर्टी कार्ड व हुकूम प्रत्येकी ११० रुपयात घरात बसून मिळवता येईल. अनाधिकृत बांधकाम बाबत माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्याची तक्रारदारांची इच्छा असेल तर ते गोपनीय ठेवण्यात येईल. या सेवा सुरू करण्यात आले आहेत.’’-पी. शिवशंकर, पालिका आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.