आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:विद्यापीठास 9 महाविद्यालयांचा प्रस्ताव

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत चार वर्षांमध्ये विद्यापीठ कॅम्पसमधील ५ संकुले कार्यरत हाेती. यात ६ नव्या संकुलांना सुरुवात झाल्याने सध्या एकूण ११ संकुले आहेत. संशोधन व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी भर दिला. बृहत आराखड्यानुसार नवीन ९ महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विविध संस्थांनी विद्यापीठाला दिला आहे. तसेच, या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे नवीन महाविद्यालयही सुरू होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरूपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चार वर्षांत विविध प्रकल्प हाती घेतले.

तसेच विद्यार्थी विकासावर भर दिला आहे. कौशल्यविकास अभ्यासक्रमांतर्गत १३६ पेक्षा अधिक सर्टिफिकेट कोर्सेस विद्यापीठात सुरू आहेत. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रमासह अनेक कल्पक गोष्टींना वाव देत डॉ. फडणवीस यांनी वेगळेपण सिद्ध केले. विद्यापीठात भाषा संकुल, आरोग्य संकुल, तंत्रज्ञान संकुल, वाणिज्य व व्यवस्थापन संकुल, कला संकुल आणि जैवशास्त्र संकुल ही नवीन सहा संकुले सुरू झाली झाली. विद्यापीठात बंद पडलेला एमबीए कोर्स सुरू झाला. मायक्रोबॉयलॉजी विभाग सुरू केला. केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले.

नॅक मूल्यांकनात ‘बी प्लस प्लस’ दर्जा मिळवला
नॅक मूल्यांकनात ३४ गुण वाढून २.९६ सह ‘बी प्लस प्लस ‘ चा दर्जा मिळविला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व स्मारकासाठी राज्य शासनाकडून १४ कोटी २४ लाख ९२ हजार २३८ रुपये निधी मंजूर झाला आहे. पुतळा तयार करण्यासाठी ७९ लाख ५२ हजार रुपयांचा कार्यारंभ आदेश शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर नवीन प्रशासकीय इमारत ही अतिशय भव्य व सुंदर होत आहे, त्याचेही लवकरच उद्घाटन होईल आणि विविध प्रशासकीय विभाग तिकडे जातील, यासाठी आता काम करावयाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...