आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी, बारावीच्या परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे:ग्रेस गुणांसाठी मार्चअखेर प्रस्ताव सादर करावे लागणार, 49 खेळांमधील विद्यार्थ्यांनाच फायदा

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी व बारावीच्या मार्च २०२३ च्या परीक्षेस बसणाऱ्या व बसलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस (सवलतीचे) गुण मिळण्याचे प्रस्ताव शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी मार्चअखेर संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास पाठवायचे आहेत. तसेच शास्त्रीय (गायन, वादन नृत्य) कला, चित्रकला, लोककला, एनसीसी, स्काऊट व गाइड या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे यादरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळवले आहे

शालेय क्रीडा स्पर्धेतील अनुदानित ४९ खेळांतील विद्यार्थ्यांनाच हे ग्रेस गुण मिळतात. तसेच ऑलिम्पिक, आशियाई व कॉमनवेल्थ गेममध्ये समाविष्ट असलेले ३२ खेळ आणि समाविष्ट नसलेले आणि १७ खेळांतील विद्यार्थ्यांनाही हे गुण मिळतात. यासाठी भारतीय ऑलिम्पिक व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेस संलग्न संबंधित राज्य संघटनेने याचा अहवाल राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सादर केला पाहिजे. नंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालय या खेळांची यादी जिल्हा क्रीडा कार्यालयास पाठवते.

या खेळांना मिळणार ग्रेस गुण
शालेय अनुदानित आणि विविध क्रीडा संघटनेचे (४९ खेळ) : सुब्रतो फुटबॉल, नेहरू हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग रोड रेस, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, कराटे, खो-खो, किक बॉक्सिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग व हॉकी, शूटिंग बॉल, सिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, जलतरण डायव्हिंग व वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योगासन, रग्बी, मॉडर्न पेंटथलान, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाइट, आट्यापाट्या.

बातम्या आणखी आहेत...