आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांना निवेदन:प्रस्तावित नागपूर-गोवा महामार्गात तीर्थक्षेत्रे समाविष्ट व्हावीत : मोहिते

अकलूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राने प्रस्तावित केलेल्या नागपूर ते गोवा हा नवीन द्रुतगती महामार्गा महाराष्ट्राच्या मधोमधून जाणार आहे. महाराष्ट्रातील अविकसित व तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणाहून हा महामार्ग गोव्यापर्यंत करावा, अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या महामार्गाचे अंतर कमी होऊन अविकसित भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुचित केले आहे.

सध्या नागपूर ते गोवा या ९९० किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. सध्याचा वर्धा -यवतमाळ - नांदेड -लातूर -सोलापूर - मिरज - कोल्हापूर येथून म्हापसा मार्गे पणजी येथे जातो. यासाठी ९९० किलोमीटर लांबीचा पल्ला आहे. हा प्रवास सुमारे २० तासांचा आहे. नागपूर - गोवा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्राच्या मधोमधून प्रस्तावित आहे. हा द्रुतगती महामार्ग तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातील अविकसित क्षेत्र विकसित होण्यासाठी खूप वाव आहे. नागपूर -गोवा द्रृतगती हा प्रस्तावित महामार्ग मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग, सुरत -चेन्नई द्रुतगती ग्रीन फील्ड महामार्ग व मुंबई - बेंगलोर द्रुतगती ग्रीनफिल्ड महामार्ग या तीन महामार्गांना जोडून गोव्याकडे जाणार आहे.

त्यामुळे या सर्व प्रदेशातील विकासाला मोठी चालना मिळेल. त्यासाठी या महामार्गाच्या प्रवासात महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे व अविकसित क्षेत्रे समाविष्ट करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे मोहिते पाटील म्हणाले.

सूचवलेला महामार्ग : नागपूर पासून बुटीबोरी - वर्धा - महागाव - अर्धापूर अंबाजोगाई - परळी -कुर्डूवाडी - अकलूज - म्हसवड - विटा कोल्हापूर ते पणजी याप्रमाणे हा द्रुतगती महामार्ग केल्यास प्रवासाचा वेळही कमी होईल. त्याशिवाय महामार्गावर रेणुकामाता देवी तीर्थक्षेत्र माहूर, योगेश्वरी देवी तीर्थक्षेत्र अंबाजोगाई, वैजनाथ मंदिर परळी, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथून हा द्रुतगती महामार्ग नेण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...