आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

330 दिव्यांगांना मदत‎:शिबिरात 330 दिव्यांगांना कृत्रिम अवयव‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातात किंवा जन्मत: हात पाय‎ नसलेल्या ३३० दिव्यांग बांधवांना‎ आणि भगिनींना कृत्रिम हात आणि‎ पाय देऊन नव्या जीवनाची सुरुवात‎ करून दिली.‎ सूरज करण सांस्कृतिक व‎ बहुद्देशीय संस्था, साधू वासवानी‎ मिशन (पुणे) आणि पुणे मायुम‎ मिडटाऊन शाखा यांच्या मुख्य‎ संयुक्त विद्यमाने मंगळवारी कृत्रिम‎ हात-पाय बसवण्यासाठी शिबिर‎ झाले. श्री शिवानुभव मंगल‎ कार्यालयात शिबिरासाठी दिव्यांग‎ बांधवांनी गर्दी केली होती.‎

अॅड. किरण वळसंगकर, श्रीशैल‎ बनशेट्टी, अध्यक्ष मनीष उपाध्ये,‎ सचिव आशिष उपाध्ये, मनीष‎ लक्ष्मीनारायण पंचारीया, कोषाध्यक्ष‎ मिनिता उपाध्ये उपस्थित होते.‎ कृत्रिम हात व पाय, १ व्हील‎ चेअरचे मोफत वितरण मिशनतर्फे‎ करण्यात आले. २३ डॉक्टर आणि‎ तंत्रज्ञ यांचे पथक, शिबिर प्रमुख‎ मिलिंद जाधव, सुशील ढगे, डॉ.‎ सलील जैन यांचे मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...