आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीपरला बैठक:पालखी सोहळ्यामधील भक्तांना संरक्षण, पोलिस मित्र, भक्तांचे सहकार्यही महत्वाचे; प्रशासनकडून हालचाली

अकलूज22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतांच्या पालख्यांमध्ये अखंड महाराष्ट्रातून भक्तगण येतात. त्यांना सर्वप्रकारच्या सुविधांसह सौजन्याची वागणूक देऊन आपल्या गावाचा व पंचक्रोशीचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी केले. संत श्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात त्यांनी महाळुंग -श्रीपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दल, पोलिस मित्र संघटना आदींची बैठक श्रीपूर येथे घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर म्हणाले, दोन वर्षांच्या खंडानंतर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. ४ जुलै रोजी संत तुकोबांची पालखी इंदापूर तालुक्यातील सराटी येथे मुक्कामास असली तरी या पालखीचा बहुतांशी समाज अकलूज येथे मुक्कामास असतो. ५ जुलै रोजी पालखीचा मुक्काम अकलूजला असून ६ जुलैला पालखी बोरगाव मुक्कामी आहे. त्यानंतर ७ जुलैला ती आपल्या हद्दीतून पंढरपूर तालुक्यात प्रवेश करते. या दरम्यानच्या काळामध्ये शासन स्तरावर पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पालखीमधील सर्व गैरप्रकारांवर आळा घालण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असते ती आपण सर्वांनी सक्षमपणाने पार पाडली पाहिजे. त्यासाठी पोलिस प्रशासनासह ग्रामसुरक्षा दल पोलिस, मित्र संघटना आणि पोलिस पाटलांनी दक्ष राहण्याच्या सूचना व विनंती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी केली. यावेळी पोलिस हवलदार रमेश सुरवसे पाटील आदींनी सूचना केल्या. कार्यक्रमास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब पानसरे,पोलिस हवलदार किशोर गायकवाड, संजय चंदनशिवे निशांत सावंजी यांच्यासह पोलिस पाटील ,ग्राम सुरक्षा दलाचे जवान, पोलिस मित्र परिवार उपस्थित होते. नागरिकांनी-पोलिस मित्रांनी सतर्क राहिले पाहिजे : कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्या असल्या तरी माळशिरस व पंढरपूर तालुक्यांत हे पालखी सोहळे येत असताना राज्यातील विविध भागातून अनेक छोट्या- मोठ्या पालख्या या पालखी सोहळ्यांमध्ये समाविष्ट होत असतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पोलिस प्रशासनावर मोठा ताण असतो. त्यासाठी नागरिकांनी व पोलिस मित्रांनी सतर्क राहिले पाहिजे, असे अरुण सुगावकर यांनी सांगितले. पालख्या जातात त्या गावांत बेठका घेऊ असे सांगितले.

पंढरपूर वाखरी ता. पंढरपूर येथील बाजीराव विहिरीच्या ३ बाजूने मजबूत लोखंडी बॅरिकेड्स बसवून विहीर सुरक्षित करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाजीराव विहीर येथेच होणाऱ्या रिंगण स्थळाकडे जाण्यासाठी ३ ठिकाणी मोठ्या सिमेंट पाइप टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. शिवाय येथील उड्डाण पुलाखालील पाण्याचा निचरा होण्यासाठी चरही काढण्यात आली आहे. या प्रश्नाकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधून घेतले होते आणि पाठपुरावा केला होता. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान १० दिवसांवर येऊन ठेपले आहे. २० जून रोजी संत तुकाराम आणि २१ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...