आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Protesting Against Inflation, The Nationalist Youth Congress Felt Like A Lotus Flower, Symbolically Agitating Against Inflation | Marathi News

आंदोलन:महागाईचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटली कमळाची फुले, महागाईचा विरोध करत प्रतीकात्मक स्वरूपात आंदोलन

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाईचा विरोध करत प्रतीकात्मक स्वरूपात जनतेला कमळाची फुले वाटण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला केक कापून निषेध नोंदविला. शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहधारकांना कमळाचे प्रतीकात्मक फूल देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

‘कमल का फूल एप्रिल फूल’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘एक ही भूल कमल का फूल’, ‘महागाई कमी करण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘देशाचे वाटोळे करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘पेट्रोल शंभरी पार, मोदी सरकार खुशाल यार’, ‘सामान्य जनतेला बेकारीच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

महागाईमुळे महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. देशातील नागरिकांची महागाईमुळे झोप उडालेली असताना केंद्रातील मोदी सरकार महागाई कमी करण्यासाठी हतबल ठरले आहे. कमळ फुलाच्या साक्षीने देशात सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असा आरोप करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अहमद मासुलदार, आशिष बसवंती, मुसा अत्तार, प्रशांत फाळके, विक्रांत खुणे, महेश पवार, कृणाल वाघमारे, हुसेन शहानूरकर, मुझफ्फर बागवान, जहीर गोलंदाज, सर्फराज बागवान, सादिक कुरेशी, विश्वनाथ बिडवे, मोहसीन मुजावर, शुभम शितोळे आदींचा सहभाग होता.

फसवणूक करून सत्तेवर
महागाई कमी करू, बेरोजगारांना रोजगार देऊ, युवकांना नोकऱ्या देऊ, देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये टाकू, अशी खोटी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनता व युवकांची फसवणूक करून देशाची सत्ता मिळवली. केंद्रातील मोदी सरकार खऱ्या अर्थाने एप्रिल फूल करण्याच्या लायकीचेच आहे. जुबेर बागवान, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...