आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे देहू येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाकडून राज्यातील विविध पक्ष नेत्यांना भाषण करण्याची संधी दिली, पण राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना संधी नाकारली, त्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष भारत जाधव, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या आंदोलनात प्रदेश सचिव संतोष पवार, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, जनार्दन कारमपुरी, दिलीप कोल्हे, नलिनी चंदेले, सायरा शेख, लता ढेरे, संगीता जोगदंडकर, गौरा कोरे, मंगला कोल्हे, शशिकला कसपटे, वंदना भिसे, अमीर शेख , रियाज मोमीन शिवराज विभुते, ज्योतिबा गुंड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...