आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:गरजू विद्यार्थिनींसाठी सोशल कन्या विकास निधीची तरतूद; शैक्षणिक व दुर्धर आजाराच्या खर्चासाठी अर्थिक मदत

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल महाविद्यालयातील ५० हून अधिक मुलींना लाभ, दानशूरांची मदत सोलापूर सोशल असोसिएशन कला व वाणिज्य महाविद्यालयात गरजू विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रवाहात राहिल्या पाहिजेत. पैशाविना कोणत्याही मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत. मुलींचे शिक्षण थांबू नये, आजारपणातही त्यांना अर्थिक मदत व्हावी, यासाठी महाविद्यालयात सोशल कन्या विकास निधीचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा लाभ मागील वर्षभरापासून ५० हून अधिक मुलींना झाला आहे.

या निधीचा वापर फक्त गरजू मुलींच्या शैक्षणिक व काही दुर्धर आजारपणासाठी मदत म्हणून केला जात आहे. सोशल महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. इ. जा. तांबोळी यांनी पदभार घेतल्यापासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थीभिमुख कार्यक्रम राबवण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीच्या स्वरुपात देणगी गोळा केली जाते. त्या निधीचा वापर सोशल कन्या विकास निधीच्या माध्यमातून शैक्षणिक कामासाठी केला जातो.

गरजू मुलींना लाभ
महाविद्यालयात जास्त करून मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या मुली सामान्य कुटुंबातील असल्याने शैक्षणिक शुल्क भरण्यासाठीही नसतात. ही समस्या भेडसावत होती. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये. यासाठी सर्व समाजातील दानशूर व्यक्ती व शिक्षकांच्या मदतीने सोशल कन्या विकास निधी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून शाळेतील बऱ्याच गरजू मुलींना लाभ होत आहे. दुर्धर आजारासाठी ही मदत केली जात आहे. डॉ इक्बाल तांबाळी, प्र. प्राचार्य, सोशल महाविद्यालय

सर्वत्र कौतुक
सोशल महाविद्यालयात सोशल कन्या विकास निधी हा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. समाजातील दानशूर व्यक्तीबरोबर महाविद्यालयातील शिक्षकही वर्षाकाठी दोन हजार रुपये देऊन सहभाग नोंदवतात. हा उपक्रम सुरू करून एक शैक्षणिक वर्ष संपले आहे. समाजातील गरजू महिलांना याचा लाभ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...