आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ‎:ज्येष्ठांच्या मदतीसाठी रोटरी‎ क्लबतर्फे मनोधैर्य उपक्रम‎ ; बाळीवेस येथील एसबीआय हॉल येथे आज शुभारंभ‎

सोलापूर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी एकटे राहणाऱ्या वयोवृद्धांच्या‎ मदतीसाठी सोलापूर रोटरी क्लब‎ च्या वतीने मनोधैर्य योजना सुरू‎ करण्यात येणार आहे. माया केअर‎ या संस्थेच्या सहकार्याने ही योजना‎ सोलापूरमधील वृध्दांना मोफत सुरू‎ करण्यात येणार आहे. या योजनेचा‎ शुभारंभ शनिवारी (दि. ११) जून‎ सकाळी ११ वाजता बाळीवेस येथील‎ एसबीआय हॉल येथे होणार‎ असल्याची माहिती, रोटरी क्लबचे‎ अध्यक्ष संजय पटेल यांनी पत्रकार‎ परिषदेत दिली.‎ श्री. पटेल म्हणाले,“मुले मोठी‎ झाल्यावर त्यांच्या करिअरसाठी ते‎ घराबाहेर पडतात आणि घरी‎ एकटेच वृध्द माता- पिता असतात.‎ त्यांच्या देखभालीसाठी परंतु मूलभूत‎ गरजा भागविण्यासाठी मुलांकडून‎ काही प्रमाणात व्यवस्था होते. मात्र,‎ एकटेपणा हा कायम त्यांच्यामध्ये‎ असतो. तो दूर करण्यासाठी आणि‎ त्यांना वेळेवर औषधे, भाजीपाला,‎ किराणा साहित्य आणून देणे,‎ दवाखान्यात घेऊन जाणे, बँकेत‎ किंवा कोणत्याही सरकारी अथवा‎ खासगी कार्यालयात काम असेल‎ तेथे काळजीपूर्वक नेवून परत घरी‎ आणण्यासाठी सोबतीची गरज‎ असते. ज्येष्ठ नागरिकां सोबत राहून‎ त्यांना मदत, आधार देणारे‎ स्वयंसेवक नियुक्त ‘माया‎ केअर’च्या माध्यमातून नियुक्त‎ करण्यात येतील. सोलापूरमध्ये सुरू‎ करण्यात येणार असल्याचे, पटेल‎ यांनी सांगितले.‎ मनोधैर्य योजनेत सहभाग‎ घेण्यासाठी काही तरुणांची‎ स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात‎ आली आहे. स्वयंसेवक म्हणून‎ नियुक्त करताना काटेकोरपणे‎ पडताळणी करून त्यांची सर्व‎ माहिती जमा करून ती संबंधीत‎ पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.‎ स्वयंसेवक योग्य पध्दतीने काम‎ करतात का? यावर रोटरी क्लब,‎ पोलिसांचा सहभाग असणारी‎ समिती नियुक्त करून आढावा‎ घेण्यात येईल. ही योजना पूर्णत‎ मोफत असून पहिल्या टप्प्यात १००‎ ज्येष्ठांना सेवा देण्यात येईल. त्यास‎ प्रतिसाद, मागणी पाहून पुन्हा सेवा‎ वाढविण्यात येईल, असेही त्यांनी‎ सांगितले. या पत्रकार परिषदेस‎ कौशिक शहा, शांता येळंबकर आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...