आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलिदानाचे अवमान:अजित पवार यांच्या वक्तव्याचा मोडनिंबमध्ये जाहीर निषेध

मोडनिंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोडनिंब येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांबाबत “संभाजी महाराज धर्मवीर नव्हते” असे वक्तव्य केले. सदर वक्तव्याचा मोडनिंब येथे निषेध करण्यात आला. ‘हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सदर वक्तव्यातून अवमान होत आहे. धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य हे संभाजीराजांच्या बलिदानाचा अवमान ठरत आहे, असे मत भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे यांनी व्यक्त केले. भाजपच्या वतीने येथील दत्त चौकात निषेध नोंदवला. या वेळी तालुका उपाध्यक्ष धनाजी लादे, श्रीकांत लादे, चंद्रकांत ओहोळ, अल्पसंख्याक सेलचे सादिक तांबोळी, सुधीर लादे, चंद्रकांत लोकरे, दादा नागटिळक, कल्याण मोरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...