आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Publication Of Divya Marathi Diwali Issue In Solapur : Divya Marathi Diwali Issue Is The Cultural Document Of Maharashtra; Statement By Reviewer Prof Dr Randhir Shinde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:दिव्य मराठी दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक दस्तऐवज; समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी सोलापूर आवृत्ती कार्यालयात झाले

‘दिव्य मराठीच्या दिवाळी अंकात समाजाचा आवाज आहे, क्षीण झालेले मानवी जीवनातले प्रश्न आहेत, पाड्यातले आदिवासी आहेत, उन्नत वैचारिक स्वरूपाचे शहाणपणही वृद्धिंगत करणारे आहे. वाङ्मयीन चेहरा बदलून नव्या पिढीचा आवाजही त्यात दिसताे. एकूणच पाहिल्यास हा अंक महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक दस्तावेज ठरेल,’ असे गाैरवाेद्गार काेल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ समीक्षक प्रा. डाॅ. रणधीर शिंदे यांनी येथे काढले.

‘दिव्य मराठी’ने काढलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी सोलापूर आवृत्ती कार्यालयात झाले. त्या वेळी ते बाेलत हाेते. महापाैर श्रीकांचना यन्नम, काेठारी पाइप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल काेठारी, संचालक पुष्कराज काेठारी, सुविद्या प्रकाशन संस्थेचे बाबूराव मैंदर्गीकर, पुण्यश्लाेक अहिल्यादेवी होळकर साेलापूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डाॅ. दत्ता घाेलप आदींची प्रमुख उपस्थिती हाेती.

पुढे बाेलताना डाॅ. शिंदे म्हणाले, ‘‘एकाेणिसाव्या शतकाच्या आरंभी मराठी दिवाळी अंकांना सुरुवात झाली. ध्येयवादी वृत्तीने त्याचे संपादन हाेऊ लागले. गेल्या शतकभरात मराठी िदवाळी अंकांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्याचा एक पठडीबाज आणि कलात्मक चेहरा झाला. दिव्य मराठीने मात्र हा चेहरा बदलून टाकला. स्थानिक प्रश्नांसह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहस्रमुखी आवाज त्याला दिला. व्यवस्थेतील अदृश्य घटकांचा कानाेसा घेतला. त्यासाठी वाङ््मयीन लेखनाची भाषा बदलली. सामान्यांची भाषा मांडली. पर्यावरण, जग, सिनेमा असे वैविध्यपूर्ण विषय त्यात आणले.’

‘दिव्य मराठी’च्या साेलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी प्रास्ताविकेत भास्कर समूहाच्या वृत्तपत्रांची अभूतपूर्व वाटचाल सांगितली. युनिट हेड नाैशाद शेख यांनी आभार मानले.

विविध विषयांवरच्या लेखनाने वैविध्यपूर्ण

दिव्य मराठीचा दिवाळी अंक विविध विषयांवरचा असल्याने त्यात वैविध्यता आली. वाचकांना त्याची मेजवानी मिळाली. दिव्य मराठीने असे अनेक नवे प्रयाेग केले. विकासाचा चेहरा घेऊन त्यांचे लेखन असते. दिवाळी अंकाला शुभेच्छा.” श्रीकांचना यन्नम, महापौर

प्रकाशकांना अंकातून नवे विषयच मिळतात

दिवाळी अंकाचा वाचक कमी हाेत असल्याचे वाटते. पण तसे नाही. त्याची सर्वांना प्रतीक्षाच असते. दिवाळी अंक म्हणजे फराळासारखे आहे. त्यात वैविध्यता असते. हा बुद्धीचा फराळ असताे. त्यातून प्रकाशकांना नवीन विषय मिळतात.’’ बाबूराव मैंदर्गीकर, प्रकाशक

बातम्या आणखी आहेत...