आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीएचडी करणाऱ्यांनी प्रकाशन महाग करून टाकले आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे इतर चांगल्या लेखकांवर परिणाम झाला आहे. तसेच सध्या वैचारिक लेखनाची गरज आहे. वाचन कोणीच करीत नाहीत, यासाठी लोकसभा व विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी वाचण्याची गरज आहे. त्यांनी वाचन केले तर मतदारही वाचायला लागतील. यासाठी लेखन त्या दर्जेचे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले.
गौरव साहित्यालय सोलापूरच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये सहा ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी वाघमारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे होते. व्यासपीठावर कादंबरीकार व समीक्षक डॉ. महेश खरात यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे आरसा स्त्रीमनाचा, अवधूत म्हमाणे यांचे ज्येष्ठ शक्ती व फुलांची ओळख, अरुण नवले यांचे महाराष्ट्रातील संत परंपरा व निर्मळ गाणी तसेच वंदना कुलकर्णी यांचे आस्वादाची अक्षरे या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की, स्त्री जन्म हा वाईट आहे, स्त्रीच्या अन्यायाला जबाबदार कोण? सुशिक्षित महिलांवर अन्याय अत्याचार, त्रास दिला जातो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. यासाठी स्त्रियांच्या जीवनाविषयी लेखनातून मांडणी एक स्त्रीच करू शकते. स्वागत आरती काळे यांनी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.