आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिबंधित पानमसाला विक्रीसाठी आणलेले असताना अन्न व औषध प्रशासनाने त्यावर कारवाई केली. यावेळी 41 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व नंदिनी हिरेमठ यांना वाहन क्र. आर. जे. 19, जी. बी-5707 या वाहनाची तपासणी करण्याबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नांदणी टोल नाका, मंद्रुप येथे उपरोक्त वाहनाच्या तपासणीसाठी गेले. यावेळी हे वाहन विजापूर हायवेने येताना दिसले. या वाहनास अन्न सुरक्षा अधिकारी यांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर वाहन चालकाने वाहन बाजुला थांबवले. त्यानंतर या वाहनाची अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली. त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ सदृष्य वास येत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वाहनामध्ये पानमसाला असल्याचे सांगितले. त्यानंतर वाहनचालकास मुद्देमालासह मंद्रुप पोलिस स्टेशन, मंद्रुप येथे आणले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी पुढील कारवाई घेऊन वाहन चालक सुमार आलम खान, रा. वडनावा जागेर, ता. पाचपट्टा, जि. बारमेर, राजस्थान व साथीदार रोशन शेरू खान, रा. कोडूला पारोदी, जि. बारमेर, राजस्थान तसेच गनिभाई, जिलानी ट्रान्सपोर्ट, वाहन मालक पूनम सोनाराम चंद, विकास नगर पाल लुनी, जोधपुर, राजस्थान, उत्पादक हिरा इंटरप्रायझेस या उत्पादक कंपनीचे भागीदार अस्लम तांबोळी व इब्राहीम तांबोळी यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ व प्रशांत कुचेकर तसेच नमुना सहाय्य्क श्रीशैल हिटनळ्ळी, विठ्ठल रहाटे यांच्या पथकाने पूर्ण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.