आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर राहणार वॉच:सोलापूर शहरात 500 ठिकाणी बसवले क्यूआर कोड

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात महत्त्वाच्या ठिकाणी ५०० क्यआर कोड बसवण्यात आले आहेत. त्या माध्यमातून पोलिस त्या ठिकाणी जाऊन आले की नाही हे नियंत्रण कक्षात पाहता येणार आहे. ही यंत्रणा येत्या आठवड्यात सुरू होणार. सध्या ४०० ठिकाणी क्यूआर कोड बसवण्यात आले आहेत. आणखी पुढील आठवड्यात शंभर ठिकाणी कोड लागतील. त्या ठिकाणी संबंधित दिवस पाळी व रात्रपाळी मध्ये गस्त घालणारे पोलिस, गुंड मॉर्निंग पथक, महिलांसाठी असलेले दामिनी पथक, संबंधित ठिकाणी गेले की नाही आरोपींच्या मागावर पोलिस होते का, त्या ठिकाणी तपासणी केली का, याचा याची माहिती नियंत्रण कक्षात बसून मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.