आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:गुणप्रत दुरुस्तीचा प्रकार यापुढे बंद; जिल्हा दूध संघाचा निर्णय

उत्तर सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुणप्रत कमी असलेले दूध स्वीकारले जाणार नाही. तसेच आत्तापर्यंत चालत आलेला गुणप्रत दुरुस्तीचा प्रकारही यापुढे बंद करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी येथील संघाच्या जागेवर आरसीसी गाळे बांधण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. सोमवारी संघाच्या संचालकाची मासिक बैठक पार पडली यामध्ये हे निर्णय घेण्यात आले.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या दुधाचा दर्जा सर्वोत्तम राखण्यासाठी संकलित होणाऱ्या दुधामध्ये गुणप्रत कमी असलेले दूध यापुढे न स्वीकारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. गेल्या काही महिन्यात काही सभासद संस्थांचे कमी प्रतीचे दूध स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये काही संचालक मंडळाशी संबंधित असलेल्या संस्थांचा सहभाग होता.

त्याचबरोबर संघामध्ये काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुणप्रतीमध्ये बदल करून घेण्याचा प्रकार सुरू होता. यासंदर्भात ही पद्धत बंद करण्याचा निर्णय ही संचालक मंडळांनी घेतला आहे. संघाच्या टेंभुर्णी येथील जागेवर गाळे बांधण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. सोमवारच्या बैठकीत हे गाळे आरसीसी पद्धतीने बांधण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर एनडीडीबीकडे संघाच्या वतीने संस्था सबलीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या आठ कोटीच्या प्रस्तावामध्ये सभासद संस्थांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...