आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाकृष्ण विखे-पाटलांचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर:आधी नाशिक पदवीधरच्या पराभवाची जबाबदारी घ्या, मग कसब्याबद्दल बोला

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा पोटनिवडणुकीवरुन भाजपला मविआ नेत्यांकडून सातत्याने चिमटे काढले जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही कसब्याच्या निकालावरुन भाजपला लक्ष्य केले आहे. 2024 मध्येही राज्यात शिंदे-फडणवीसांविरोधात जनमत जाईल, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे. त्याला आता भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिकमध्ये पराभव का?

सोलापुरात पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीआधी नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. बाळासाहेब थोरातांनी आधी त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ते महत्त्वाचे आहे. त्याबद्दल बाळासाहेब थोरात का बोलत नाहीत.

शरद पवारांना खोचक टोला

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शरद पवारांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. देशात बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी निवडणुकांतही याचे परिणाम दिसतील, असे शरद पवार म्हणाले. याला प्रत्युत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटीलल म्हणाले, कसबा निवडणुकीवरून प्रत्येकाला परिस्थिती बदलली आहे असे वाटत आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाचा प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढत आहे. प्रत्येकाचे स्वप्नरंजन सुरू आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, तेदेखील या पंक्तीत सामील झाले आहे. त्यांना स्वप्न पाहण्यापासून आपण थांबवू शकत नाही.

देशात बदलाचे वारे नाही

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्याकडेला पूर्वी पोपट बसत होते, त्यांची उपासमार तुम्ही का करता? भविष्य सांगणे त्यांचं काम आहे, ते काम त्यांना करू द्या. देशात सध्या कोणतेही बदलाचे वारे नाहीत आणि असा बदल करण्याची जनतेचीदेखील इच्छा नाही.

नगर जिल्ह्याचेही नामांतर

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याविषयी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे, असा प्रस्ताव आहे. त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव हे नगर जिल्ह्यात आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला देणे हे भूषणावहच आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

संबंधित वृत्त

शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल:कसबा पेठेतील पराभव म्हणजे बदलाचे वारे, देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये परिणाम दिसणार

नुकत्याच झालेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकांत यश मिळाल्याचा दावा करत भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देशभरात बदलाचे वारे आहे, असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे. बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वारे तयार होत आहे. महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक संस्था मतदारसंघासह इतर तीनचार निवडणुका झाल्या. त्या निवडणुका काय सांगतात? जवळपास सगळीकडे भाजपला एखाद दुसरी जागा सोडली तर यश मिळाले नाही. राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार होते. निवडणुकांत त्यांनी सत्तेचा वापर केला. तरीही भाजपला यश मिळाले नाही. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...