आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प:राेटरी एमआयडीसीची संकल्पपूर्ती‎ युवतींना प्रशिक्षण, व्यवसाय संधी‎

साेलापूर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राेटरी क्लब ऑफ साेलापूर‎ एमआयडीसीच्या वतीने युवतींना माेफत‎ फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देऊन‎ व्यवसायाची संधी देण्याचा संकल्प‎ करण्यात आला हाेता. ताे यशस्वी‎ झाल्याची माहिती क्लबच्या महिला‎ अध्यक्षा लता चन्ना यांनी दिली. त्यांनीच‎ हा संकल्प केला हाेता. त्याच्या पूर्ततेसाठी‎ गेल्या पंधरा दिवसांपासून त्या या कामाला‎ झाेकून दिल्या. प्रशिक्षणार्थींना महिला‎ दिनाच्या दिवशी माेफत शिलाई मशीन‎ देऊनच संकल्पपूर्ती हाेईल, असेही त्या‎ म्हणाल्या.‎ ‘सावित्रीच्या लेकींचे सबलीकरण’‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असे या उपक्रमाचे ब्रीद आहे.‎ पूर्वभागातील महिला केवळ विड्या‎ वळण्यातच नाहीत, तर त्यांच्या‎ कलागुणांना वाव दिल्यास त्या वेगळेही‎ काही करू शकतात.‎

शिलाई मशीन देण्याचा संकल्प‎१५ दिवसांच्या या‎प्रशिक्षण उपक्रमात २०‎महिलांचा सहभाग‎हाेता. शिलाईपासून‎फॅशनचा ट्रेंड या विषयी‎त्यांना मार्गदर्शन‎ करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना माेफत‎ शिलाई यंत्रे देणार आहाेत.‎लता चन्ना, क्लबच्या अध्यक्षा‎

बातम्या आणखी आहेत...