आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:रागिणी क्रिकेट क्लब विजेता, महिला दिनानिमित्त क्रिकेट सामन्यात प्रकाश कंपली क्रिकेट अकादमीस हरवले

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्यात रगिनी क्रिकेट क्लबने प्रकाश कंपली क्रिकेट अकादमीवर नऊ गडी राखून विजय मिळवला.

रेल्वे मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कंपली क्रिकेट अकादमीने १८ षटकांत ८ बाद ९० धावा केल्या. यात किरण मनियार २९ व ऐश्वर्या गिरे हीने २० धावा काढल्या. रागिणी क्लबकडून रितू भोसले व प्राचीने २ तर प्रसिद्धी जोशीने एक बळी टिपला. विजयी लक्ष्य रागिणी क्लबने १० षटकांत एक गडी गमावत गाठले. रागिणी क्लबकडून प्रसिद्धी जोशी नाबाद ३८ व रितू भोसले नाबाद २३ तर कल्याणी चव्हाण १४ केल्या. केपी अकॅडमीकडून ऐश्वर्या गिरे हिने एक बळी टिपला. यात फलदांजाचे पारितोषिक प्रसिद्धी जोशी, सामनावीरचे रीतू भोसले, गोलंदाजांचे पारितोषिक प्राची कुमारी व यष्टिरक्षकचे पारितोषिक मयुरी थोरात यांनी पटकावले.

उद्घाटन रेल्वे क्रीडाधिकारी विवेक हाके, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष महादेव न्हावकर, मध्य रेल्वे मजदूर संघाचे सचिव उल्हास बागेवाडी, अध्यक्ष किशोर पिल्ले, क्रीडा संघटक रवींद्र नाशिककर, सुदेश मालप, रागिणी क्रिकेट क्लबचे मल्लीनाथ याळगी व कंपली अकादमीचे प्रकाश कंपली आदींच्या उपस्थितीत झाले.

नगरसेविका सारिका सुरवसे, रेल्वे इन्स्टिट्यूटचे सचिव जयलक्ष्मी, सुनीता गुराखे, ऋतुजा सोनवणे व शिरीष सरदेशमुख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या वेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू, प्रकाश भुतडा, अप्पू गोटे उपस्थित होते. उद्योजक दत्ता सुरवसे यांनी पारितोषिके पुरस्कृत केली होती.

बातम्या आणखी आहेत...