आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:धाब्यांवर छापा, 3  चालकांसह 19 जणांवर कारवाई

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर, परिसरातील तीन धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. गुरुवारी त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता तिन्ही धाबा चालकांचा प्रत्येकी २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण एक लाख १३ हजारांचा दंड ठोठावला.

बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक संभाजी फडतरे यांनी पथकासह केगाव-देगाव रस्त्यावरील हॉटेल जय भवानी फॅमिली गार्ड धाब्यावर छापा टाकला. त्यावेळी नऊ मद्यपी ग्राहक, चालक बाबाराव हरिबा जाधव ( वय ४९, रा. केगाव परिसर) यांना ताब्यात घेतले.

तसेच, पुणे-सोलापूर महामार्गावर निरीक्षक पुष्पराज देशमुख यांच्या पथकाने दख्खनचा वाडा येेथे टाकलेल्या छापामध्ये सहा ग्राहकांसह, चालक गणेश मोरे यांना ताब्यात घेतले. निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुल परिसरातील हॉटेल लक्ष्मी ढाब्यावर कारवाई केली. त्या ठिकाणी चार ग्राहकांसह, चालक राजेश सिद्राम बिंगी यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...