आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:चपळगाव हद्दीतील धाब्यावर छापा

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्क्लकोट – हन्नूर रोडवरील चपळगाव गावाच्या हद्दीतील हॉटेल रॉयल धाबा येथे छापा टाकून कारवाई करण्यात आली. याठिकाणी ताब्यात घेतलेल्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अक्कलकोट यांच्या समोर उभे केले असता हॉटेल मालकास २५ हजार तर प्रत्येक मद्यपीस एक हजार असे एकूण २९ हजारांचा दंड केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

या कारवाई हॉटेल मालक अबुजर मैनुद्दीन पटेल,(वय ५३ ) यांच्यासह ग्राहक गौरीशंकर बसवनप्पा बळुरगे (वय ४२), शिवशरण शिवपुत्र अचलेरे (वय ३६), संदीप राजेंद्र गजधाने (वय २२) व सिद्धराम बाबूराव वाले (वय ३२ सर्व राहणार चपळगाव ता. अक्कलकोट) यांना अटक करुन ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून एक हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास अधिकारी यांनी १५ नोव्हेंबर रोजी गुन्ह्याचे आरोपपत्र मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अक्कलकोट यांचे न्यायालयात दाखल केले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, सुनील कदम, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सुरेश झगडे, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर व जवान ईस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकाने पार पाडली.

उत्पादन शुल्कची धडक मोहीम सुरूच, आतापर्यंत ४३ जणांवर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर महिन्यापासून अवैधरीत्या दारू पिण्याची व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध करुन देणाऱ्या धाबे व हॉटेलवर धडक मोहीम राबविली. मागील दोन महिन्यात विभागाकडून सात धाब्यांवर कारवाई करण्यात आली. यात एकूण ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून धाबा मालक /चालक व मद्यपी ग्राहकांना एकूण दोन लाख ५८ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...