आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे बोगद्याजवळ, उमा अपार्टमेंट पाठीमागे बंद पत्रा शेडजवळ मोकळ्या जागेत बिनधास्तपणे हातभट्टी दारू विकली जात होती. पोलिसांनी छापा टाकून तीन हजार रुपये किमतीची ३० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच अमोल काशीनाथ विटे (रा. केगाव), अंबादास विटे, चंद्राबाई काशीनाथ चव्हाण (रा. केगाव), शिवाजी सुखदेव खंदारे (वय ३५, रा. निराळे वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल कुमार उत्तमराव शेळके यांनी फिर्याद दाखल केली. रस्त्यावर अडथळा, फुल विक्रेत्यावर गुन्हा दाखल
जगदंबा चौक, गणेश हॉटेलसमोर हातगाडीवर फुलांचे हार विक्री करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण केला होता. यामुळे पोलिसांनी महिबूब बाबूलाल शेख (वय ४२, रा. शास्त्रीनगर) याच्यावर गुन्हा सदर बझार पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पावसाचे पाणी दारात पडत असल्याच्या कारणावरून मारहाण पावसाचे पाणी पत्र्याच्या पणाळीतून शेजारच्या दारात पडत असल्याच्या कारणातून सुधाकर रघुनाथ घाडगे, महेश रघुनाथ घाडगे, रमेश ज्ञानोबा पाटील यांनी प्रकाश बाळासाहेब घाडगे (वय ३४, रा. पंढरपूर) यास काठीने मारहाणा केली. जखमीस सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
एसटी मागे घेत असताना अपघात
सोलापूर एसटी स्टॅन्डमध्ये एसटी वाहन मागे घेत असताना विश्वनाथ कापसे (वय ६२)च्या पायावरून गाडीचे चाक गेले. त्यात तो जखमी झाला आणि त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
उसने पैसे देण्या-घेण्यावरून झाली मारहाण
उसने पैसे देण्या-घेण्यावरून वाहिद जहागीरदार (रा. गोदूताई विडी घरकुल) व त्याच्या दाेन साथीदारांनी मिळून महिबूब सलीम जकलेर (वय ३०) यास मारहाण केली. लाथाबुक्क्याने आणि लोखंडी वस्तूने डोक्यात मारून जखमी केले, अशी फिर्याद महिबूब जकलेर यांनी दिली. यावरून तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.