आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:रेल्वेची महिन्यात 24 ऑनलाइन तिकिटे काढता येणार; रांगेत उभे राहणे टळणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेने प्रवास करण्यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीट काढण्याच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. सध्या सहा ते १२ तिकिटे महिन्यात काढता येत होती. ती मर्यादा आता १२ ते २४ करण्यात आली आहे.

प्रवाशांचा आरक्षण बुकिंग खिडकीसमोर रांगेत उभारण्यासाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आयआरसीटीसी वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग तिकिटाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आधार लिंक नसलेल्या युजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिटे आयआरसीटीसीच्या वेबसाइट, अॅपवर ऑनलाइन काढता येतात आणि आधार लिंक असलेल्यांना एक महिन्यात जास्तीत जास्त १२ तिकिटे ऑनलाइन बुक करता येतात. यामध्ये बदल करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आधार लिंक नसलेल्या यूजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिटे बुक करण्याची मर्यादा १२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आधार लिंक असलेल्या वापरकर्त्याद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त १२ तिकिटे बुक करण्याची मर्यादा २४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय धेतला आहे. आधार लिंक केलेल्या युजर आयडीची तिकिटे आणि बुक केलेल्या तिकिटातील प्रवाशांपैकी एकाची आधारद्वारे पडताळणी करता येईल.

बातम्या आणखी आहेत...