आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनियोजित नगररचनेचा अभाव:विकासक प्लाॅट विकून जातात, नंतर अडचणी जाणवतात; पावसाळ्यात समस्यांचा पाऊस

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त ले आऊट असून त्यात अंतिम ले आऊटचे प्रमाण कमी आहे. प्राथमिक ले आऊट जास्त प्रमाणात असून गुंठेवारीच्या ठिकाणी सोयी सुविधांचा वानवा आहे. यामुळे पावसाळ्यात आरोग्यांचा सामना करावा लागत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

शहराची हद्द वाढत असून हद्दवाढच्या बाह्य भागात ड्रेनेज लाईन नाही. उघड्या गटारी, रस्ता नाही, पावसाळ्यात दलदल निर्माण झाल्याने रहदारीस अडचण येत आहे. गुंठेवारी जागेत याबाबत अडचणी मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. निलम नगर परिसरातील सोनी नगरासह शहरात विविध ठिकाणी असे अडचण येत असून, याबाबत महापालिका गांभीर्य नसल्याचे दिसून येतो. काही विकासक प्लाॅट विक्री करुन जातात त्यानंतर अडचणी जाणवू लागतात.

आकडे बोलतात...

  • प्राथमिक ले आऊट 1740
  • अंतिम ले आऊट- 324

कोठे काय अडचण

अंतिम ले आऊट - अंतिम ले आऊटच्या ठिकाणी आरक्षीत जागा आहेत पण त्या विकसीत झाले नाहीत. अतिक्रमण झाले आहेत. विकासक गेल्यावर रस्त्यावर बांधकाम केल्याने अडचण आहे. विजापूर रोड परिसरात याबाबत तक्रारी होत्या.

प्राथमिक ले आऊट - प्राथमिक ले आऊट केल्यानंतर पालिकेने यापूर्वी तेथे बांधकाम परवाना दिले. त्यामुळे विकासक जागा विक्री करुन गेले. ती जागा महापालिकेस हस्तांतरीत न केल्याने पालिका तेथे विकास कामे करत नाही. विकास शुल्क प्लाॅट धारकांना भरण्याची पाळी येतो. आता बांधकाम परवाना बंद केले.

गुंठेवारी - गुंठेवारी जागेत ले आऊट नसल्याने रस्ते अरुंद आहेत. सार्वजनिक सुविधासाठी जागा आरक्षीत नसल्याने उद्यान, दवाखाना, वीज मंडळ, पोलिस चौकी, शाळा, मंडई आदी सोयी जागेपासून लांब जात आहेत. गुंठेवारी जागेचे किंमती कमी होत आहेत.

अशी ही स्थिती

निलम नगरजवळील आकाशवाणी केंद्राच्या मागे सोनी नगर असून, तेथे सुमारे 100 प्लाॅट आहेत. तेथे मोठे घरे झाले आहेत. पण ड्रेनेज लाईन व रस्ता नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. नगरात टाॅवेल कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी येत नसल्याने घरात केमिकल वास येत आहे. नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नाही. दलदल निर्माण झाल्याने बांधलेल्या घरापर्यंत जाण्यास रस्ता नाही. घर का बांधले असा प्रश्चाताप होत आहे. तेथील नागरिकांनी पालिकेस तक्रार दिले पण उपयोग झाला नाही.

सोयी नाहीत आता पश्चाताप होतोय

''आम्ही प्लाॅट घेतले, पण विकासक रस्ता व्यवस्थित केला नाही. रसायन मिश्रीत पाणी वाहत असल्याने रस्ता नाही. मुल आजारी पडत आहेत. पाणी साचल्याने घरात १२ महिने ओलावा असतो त्यामुळे आरोग्य धोक्यात आले. महापालिकेस तक्रार दिले पण उपयोग झाला नाही.'' - रवी कांतिल, नागरिक

बातम्या आणखी आहेत...