आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृग नक्षत्राची जोरदार हजेरी:ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेत- शिवारात पाणी

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरात वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदी झाले असून असून खरिपाच्या पेरणीसाठी पुरेशी ओल होण्यास मदत झाली आहे. मंद्रूपसह बसवनगर, हत्तुर वांगी, वडकबाळ, औराद शिवारातही मृग नक्षत्राचा जोरदार पाऊस झाला. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेत शिवारात मशागतीची लगबग सुरू आहे. या पावसामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, हुलगे पेरणीला वेग आला आहे.

दरम्यान मंगळवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात कारहुनवी (कर्नाटक बेंदूर) साजरी करण्यात येते. रविवारी मृग नक्षत्राचा पावसामुळे शेतकरी आनंदी झाला असून यंदाच्या वर्षी कारहुनवी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. जवळपास दीड तास पावसाचा सुरू असल्याने नांदणी, कुरघोट, येळेगाव, शिवारातील सखल भागात पाणी साचले.

बातम्या आणखी आहेत...