आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता गरजेची:सोलापूर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार रेनकोट; येत्या दहा दिवसांत वाटप

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. पावसामुळे स्वच्छतेमध्ये बाधा येऊ नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील बदली, रोजंदारी, झाडूवाली, गटार बिगारी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्यावतीने रेनकोट देण्यात येणार आहे. रेनकोट महापालिकने मागवले असून पुढील दहा दिवसात वाटप करण्यात येणार आहे.

रेनकोटची मागणी

सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्यावतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे रेनकोटची मागणी करण्यात आली हाेती. यासाठी कामगार संघटनेचे सायमन गट्टू, बापू सदाफुले यांनी मागणी केली होती. त्यानुसार रेनकोट मागवण्यात आले आहेत. याबाबत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी कामगार संघटनाना बोलवून रेनकोट आल्याची माहिती दिली.

पावसापासून संरक्षण

रोजंदारी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच रेनकोट मिळत असल्याचे सांगण्यात आले. सुमारे हजार कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याचे नियोजन आहे. यामुळे पावसाळ्यात सफाई करण्यास अडचण दूर हाेईल. मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजार पसरवण्यापासून प्रतिबंध करता येईल. यामुळे पालिका सफाई कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळेल, असे कामगार संघटनेचे बापू सदाफुले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...