आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:माळीनगर कारखान्याच्या चेअरमनपदी राजेंद्र गिरमे

अकलूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर या साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजेंद्र गिरमे यांची रविवारी निवड झाली. मॅनेजिंग डायरेक्टरपदी ५ डिसेंबरला नंदकुमार गिरमे यांची निवड झाली होती. राजेंद्र गिरमे हे सलग पंधरा वर्षे या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राहिले आहेत.माळीनगर साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या सभेची रविवारी कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे विद्यमान चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे हे होते.

या सभेत नूतन चेअरमन राजेंद्र गिरमे यांची सर्व संचालकांनी पुढील दोन वर्षांसाठी एकमताने निवड केली. या वेळी कारखान्याचे होलटाइम डायरेक्टर सतीश गिरमे, व्हाइस चेअरमन परेश राऊत, संचालक अशोक गिरमे, राहुल गिरमे, गणेश इनामके, मोहन लांडे उपस्थित होते.राजेंद्र गिरमे हे ३३ वर्ष कारखान्याचे संचालक मंडळात असून त्यांनी व्हाईस चेअरमन,होलटाईम डायरेक्टरपदी काम पाहिले आहे. शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हाईस चेअरमन कपिल भोंगळे, एज्युकेशन सोसायटीचे संचालक अजय गिरमे, पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके, महादेव एकतपुरे, सरपंच अभिमान जगताप यांनी श्री. गिरमे यांचा शाल व हार घालून सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...