आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाळवणी, ता. पंढरपूर येथील ग्रामपंचयतीच्या नूतन सरपंचपदी राजीव माणिक पाटील आणि उपसरपंचपदी सविता अरुण लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गतपंचवार्षिक निवडणुकीत परिचारक - काळे- संभाजी शिंदे गटाने एकत्रित येत १२ पैकी १३ जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरल्याप्रमाणे सरपंच विठ्ठल बापू चौगुले व उपसरपंच पुनम दीपक गवळी यांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्यामुळे सरपंच निवडीसाठी ३१ मे रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सरपंच पदासाठी राजीव माणिक पाटील व उपसरपंच पदासाठी सविता अरुण लोखंडे यांचा एक एक अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंच राजीव पाटील व उपसरपंचपदी सविता लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी केली. याप्रसंगी तलाठी राजेंद्र वाघमारे, ग्रामविकास अधिकारी वाघमारे यांचे सहकार्य लाभले. सदर निवड सभेप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चौगुले, वनिता लिंगे, अरुणा गवळी, सचिन कुचेकर, स्वाती माने, रणजीत जाधव, उमादेवी शिंदे, सुरेखा शिंदे, नितीन शिंदे, पोपट इंगोले, पुनम गवळी उपस्थित होते तर विरोधी गटाचे चार सदस्य गैरहजर होते.
यावेळी पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवान चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी, ज्ञानेश्वर गवळी, सुनील पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.