आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:राजीव, सुदर्शन, प्रणीत उपांत्य फेरीत, सोलापूर ओपन प्रौढांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिगरमानांकित राजीव देसाईसह सुदर्शन भय्या आणि डॉ. प्रणीत नराळेने विजयी मोहीम कायम ठेवताना मंगळवारी सोलापूर ओपन प्रौढांच्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. राजीव देसाईने ५५ वर्षांपुढील गटात एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सनसनाटी विजयाची नोंद केली. त्याने पुण्याच्या दुसऱ्या मानांकित आशिष डिकेचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला. राजीवने ६-१,६-२ ने सामना जिंकला. त्यापाठोपाठ यजमान सोलापूरच्या सुदर्शन भय्याने आपल्या घरच्या कोर्टवर ३५ वर्षांपुढील गटात पुण्याच्या नितीन सावंतला धूळ चारली. त्याने ६-२, ७-६ ने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

याशिवाय सोलापूरच्या डॉ. प्रणीत नराळे यांनी पुण्याच्या मयूर सोनीला ६-०,६-१ असे हरवले. ४५ वर्षांपुढील गटात सोलापूरच्या डॉ.सूर्यप्रकाश कारंडे यांनी पुण्याच्या राजेश दुसानेचा अत्यंत अटीतटीने ५-७, ६-३, (१०-६ सुपर टाय ब्रेक) अशी मात केली.

बातम्या आणखी आहेत...