आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:वीतराग विज्ञान बालसंस्कार शिबिरात रमले चिमुकले; सात दिवसीय शिबिर, विविध विषयांवर मार्गदर्शन

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व सर्वोदय विकास प्रभावना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांवर संस्कार करणाऱ्यासाठी वीतराग विज्ञान बालसंस्कार शिबिराचे महावीर सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात असून, मंगळवारी या शिबिराचे उद्घाटन सनतकुमार चंकेश्वरा यांच्या हस्ते करण्यात आले.

३ ते ९ मे या कालावधीत हे शिबिर चालणार आहे. मंगळवारी सकाळी शिबिराचे उद्घाटन झाले. नूतन गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील गांधी, विश्वस्त दीपक शहा, सूर्यकांत कोठारी, अरविंद शहा, सुभाष मेहता, अजित भूमकर, आदिनाथ महाराज, दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सचिव संजय शहा, प्रशांत मोहरे, शिबिराचे समन्वयक पं. विक्रांत शहा आदी उपस्थित होते. सात दिवस चालणाऱ्या या बालसंस्कार शिबिरात योगा, धार्मिक महत्त्व, ज्ञानवर्धक खेळ, जिनेंद्र भक्ती, संगीतमय पूजा, चित्रकला, कार्यानुभव, ध्यान आदी उपक्रम घेतले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...