आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी आता केंद्रात जाऊन काम करावे. त्यांना ते करावेच लागेल आणि येथील जनताही त्यांना ते करायला लावेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माढा लाेकसभा मतदार संघातून रामराजेंच्या उमेदवारीचे संकेत दिले.
उपस्थित जनसमुदायानेही हात उंचावून प्रतिसाद दिला. फलटण येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात जयंत पाटील बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, रामराजे आता वयाच्या पंच्याहत्तरीत पाेहाेचले आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपले नेतृत्व दिल्लीत केले पाहिजे. त्यांनी राज्यातून विकास निधी बराच आणला, आता केंद्र सरकारकडून निधी आणण्याची गरज आहे. ते काम ते योग्य पध्दतीने करतील. आता त्यांच्या मनात असो की नसो दिल्लीत जावेच लागेल, असे सांगत कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला.
साेलापुरात पेच निर्माण हाेण्याची चिन्हे : साेलापूर लाेकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. त्यामुळे पेच निर्माण हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच काँग्रेसकडून स्वत: सुशीलकुमार शिंदे की आमदार प्रणिती शिंदे हेही निश्चित नाही. राष्ट्रवादीने माढ्याचा उमेदवार जवळपास निश्चित केला तसा साेलापूरचा उमेदवार काँग्रेस निश्चित करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. २००९ ला माढ्यातून शरद पवार तर साेलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवून जिंकली हाेती.
राेहित पवारांनी डिवचले
साेलापूर लाेकसभा मतदार संघावर दावा करत राष्ट्रवादीचे आमदार राेहित पवारांनी काँग्रेसला डिवचले हाेते. त्यावर प्रणिती शिंदेंच्या आक्रमक उत्तराने हा विषय मावळला ताेच आता राेहित पवारांनी अकलूजकरांना डिवचले आहे. अकलूजची पूर्वीची धमक आता मावळल्यासारखी वाटतेय, असे म्हणून त्यांनी माेहिते-पाटील यांच्या वर्मावरच बाेट ठेवल्याची राजकीय चर्चा आहे.
माेदी लाटेला घाबरूनच माढ्यातून माघार घेतल्याची टीका करून माेहिते-पाटील यांनी पवारांवर शरसंधान केले आहे. येत्या लाेकसभा निवडणुकीत भाजपतर्फे रणजितसिंह माेहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी हाेत आहे. माढ्याचा सामना रंगणार माढा लोकसभा मतदार संघातून मोदी लाटेत फलटणचे रणजित नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला होता. आता यावेळी अकलूजचे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपकडून माेहिते-पाटील की विद्यमान खासदार निंबाळकर हेच, याबाबत अनिश्चितता आहे. रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध भाजप हा सामना रंगणार अशीच शक्यता आहे. दिव्य मराठी विशेष }राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले माढ्यातून उमेदवारीचे संकेत
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.