आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खर्गतीर्थावर रंगला गुरू-शिष्य भेटीचा सोहळा; मोहोळ येथील श्री नागनाथ यात्रा, यंदा पाऊस समाधानकारक राहण्याचे भाकित

मोहोळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावाक्याचे खर्ग। मिरवे सिद्धाकरी। आशंका संहारी । संभ्रमेसी । खर्गतिर्थ जगी। पवित्र पावन। नागनाथ स्नान । करी जेथे। निर्शुन्याचा डोहो। खर्ग तीर्थ पाहो। अणुमात्र संदेहो। नाही जेथे।। असे येथील खर्गतीर्थाचे माहात्म्य वर्णिले आहे. श्री सद्गुरू नागनाथ यात्रेनिमित्त बुधवारी (दि. ४) पहाटे खर्गाची मिरवणूक निघाली. त्यानंतर खर्गतीर्थावर टाळ अभंगाच्या गजरात नागनाथ महाराज व हेग्रस यांचे वंशज अरुणबुवा मोहोळकर या गुरू-शिष्यांची भेट झाली.

यंदा काही काळ रोगराई आहे. पाऊस समाधानकारक राहील. खरिपाच्या पेरण्या चांगल्या होतील. कडबा, चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, अशी भाकणूक राजेंद्र खर्गे महाराज यांनी केली. पालखीसह निघालेली खर्गाची मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती झाली.

तसेच प्रसादाचे वाटप केले. या वेळी देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते. यात्रेमध्ये मनोरंजनासाठी पाळणे, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, मिठाईची दुकाने लागली आहेत.

बातम्या आणखी आहेत...