आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी:पारंपरिक बंजारा लोकगीत, नृत्यासह रंगली धुळवड

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवठे तांडा, येथे बंजारा समाजाकडून पारंपरिक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखा साजरा केला जातो. लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण होय. ही होळी लेंगी घालून साजरी करतात. कवठे तांडा येथील धुळवड सणानिमित्त पारंपरिक बंजारा नृत्यासह रंगतदार ठरला. बंजारा समाजामध्ये पहाटेच्या वेळी होळी पेटवली जाते. प्रथेनुसार शुक्रवारी पहाटेच्या वेळी होळी पेटवली व सायंकाळी पारंपरिक नृत्यासह धुळवड साजरी करण्यात आली. बंजारा समाजाची पुरुषमंडळी पूजन करून धुलिवंदनाचा सुरुवात करतात.

दरम्यान होळी सणासाठी प्रत्येक तांड्यातून दोन जणांची निवड करतात. या दोन्ही युवकांना लेरिया-गेरीया असे नाव ठेवले जाते. ज्याचे लग्न चालू वर्षात करायचे आहे, अशी मुले होळीसाठी लाकूड जमा करतात. धुळवडीमध्ये एक हंडा जमिनीत पाच फूट खाली खोदून गाडलेला असतो. त्या ठिकाणी बंजारा समाजातील महिला अर्थात याडी या लाकूड घेऊन थांबतात. तेव्हा पुरुषमंडळी येथील हंडा काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा याडी लाकडाने या पुरुषांना मारतात.

सार्वजनिक ठिकाणच्या एरंडाच्या झाडाला आग लावली जाते. या वेळी महिला मुलांना आग लावू देत नाहीत. त्यावेळी मुले एरंडीची दांडी घेऊन पळतात. त्यास दांडी काढणे म्हणतात. पारंपरिक पद्धतीने बंजारा समाज होळी व धुळवड साजरी करतात. विनोद चव्हाण, कवठे तांडा

बातम्या आणखी आहेत...