आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Ranjit Disley | Guruji |Marathi News | Ranjit Singh Disley Guruji's Apology To The Administration: 'We Spoke Inadvertently, It Was A Mistake'

गुरुजींचा माफीनामा:रणजितसिंह डिसले गुरुजी यांचा प्रशासनाकडे माफीनामा : ‘अनवधानाने बोललो, चूक झाली’

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी माध्यमाकडे माझ्या विरोधात मुलाखतीत टिप्पणी केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा मानसिक त्रास, अधिकाऱ्यांना जेवणावळी, पैशाच्या मागणीसंदर्भात वाहिनीवरील मुलाखतीत मी बोललो. माझ्याकडून अनावधानाने तसे बोलले गेले, माझी चूक झाली आहे. यापुढे मी परस्पर मीडियासमोर जाणार नाही, असा लेखी खुलासा ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी दिल्याची माहिती, जि.प.चे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

डिसलेंना अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती, पीएच.डी. अभ्यासासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी हवी होती. पण दीड महिन्यापासून जि. प. शिक्षण विभागाने रजा प्रलंबित ठेवल्याचे सांगत त्यांनी मानसिक त्रास व पैशाच्या मागणीचा आरोप केला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रजा देण्याची सूचना सीईओ स्वामींना केली होती. डिसले गुरुजींच्या त्या अर्जामध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यांची पूर्तता करण्यासाठी शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी कामकाज करून ती पूर्तता केली. १५३ दिवसांची रजा त्यांना मंजूर करण्यात आली आहे.

दरम्यान, एका वाहिनीवरील मुलाखतीत डिसलेंनी प्रशासनाकडून पैशाची मागणी, अधिकाऱ्यांच्या जेवणावळीसाठी आग्रह, मानसिक त्रास होत असल्याचा आरोप केला होता. कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्याने तुमच्याकडे पैशांची मागणी केली? जेवणावळी मागितल्या त्यांची नावे, त्यासंदर्भात तक्रार नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत प्रशासनाला कळवा, अशा स्पष्ट सूचना सीईओ स्वामींनी दिल्या होत्या.बदनामी अनवधानाने कशी?अनावधनाने बोललो, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. मग, प्रशासनावर केलेले गंभीर आरोप, त्यामुळे यंत्रणेची झालेली बदनामी त्यांच्यासारख्या सेलिब्रिटीजकडून अनावधानाने कशी असेल, असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला.

डिसलेंचा खुलासा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवू. त्यांच्याकडून अभिप्राय आल्यानंतर प्रशासकीय निर्णय होईल. दरम्यान, डिसलेंनी शिक्षणाधिकारी त्यांच्या विरोधात मीडियासमोर बोलले, असा उल्लेख आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी लोहार यांनाही मीडियासमोर काय बोललात? कोणत्या कारणास्तव बोललात, उद्देश काय होता? अशी विचारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्वामी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...