आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परितेवाडी हे माढा तालुक्यातील (जि. सोलापूर) छोटंसं गाव. परंतु, येथील जि.प. शाळेत मूळ बार्शीचे रणजितसिंह डिसले तळमळीने शिक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून देत पिढी घडवत राहिले. या शिक्षकाच्या जिद्दीची दखल सातासमुद्रापार घेतली गेली व युनेस्को तसेच लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सुमारे ७ कोटी रुपयांचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला.
काेराेनाने आकड्यांची दहशत वाढवलेली असताना, ७ काेटी या आकड्याने मात्र अवघ्या शिक्षकांची मान जगात उंच झाली आहे. भारतातील शिक्षकाला प्रथमच हा सन्मान मिळाला. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी घोषणा करताच शिक्षक डिसले यांच्यासह सोलापूरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
या महान कार्याचा सन्मान...
> मातृभाषेतून मुलांना आकलन चांगले होते म्हणून क्रमिक पुस्तकांचा अनुवाद करून ती सहज मिळावीत म्हणून क्यूआर कोडचा वापर केला.
> त्यामुळे ऑडिओ कविता, व्हिडिओ लेक्चर्स, कथा आणि गृहपाठाचा सहज अॅक्सेस मिळला.
निम्मी रक्कम अंतिम फेरीतील ९ स्पर्धकांना
या पुरस्काराच्या ७ कोटींपैकी ५० % रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले. यामुळे नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असे त्यांना वाटते.
पुरस्कार जाहीर झाल्याने माझ्या कामाची खऱ्या अर्थाने दखल घेतल्याचे समाधान मिळाले आहे. मला मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंड करीता मी वापरणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला निश्चितच चालना मिळणार आहे. 50 टक्के पुरस्कारातील रक्कम मी अंतिम फेरीतील शिक्षकांना देणार आहे.
- रणजितसिंह डिसले,जि.प.प्राथमिक शिक्षक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.