आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण सोलापुरातील घटना:अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म, तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी ; अकरा साक्षीदार तपासले

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यासोबत दुष्कर्म केल्याप्रकरणी एका तरुणाला सात वर्षाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी.‌शिरभाते यांनी बुधवारी सुनावली आहे. परमेश्वर तुपे (रा. दक्षिण सोलापूर) याला शिक्षा झाली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी मंद्रूप पोलिसात फिर्याद दिली होती. परमेश्वर तुपेने पीडित मुलगी शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत दुष्कर्म केले होते. आणखी काही दिवसांनी पुन्हा एकदा तिच्यासोबत असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला असता ती मुलगी आरडाओरड करतच पळून गेली. हा प्रकार तुपेच्या भावाने पाहिल्यानंतर त्यानेही मुलीला थांबवून धमकावले होते. हा प्रकार पीडित मुलीच्या वडिलांनी पाहिल्यानंतर मंद्रूप पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक झाली होती.

त्यानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आाले. याबाबत अकरा साक्षीदार तपासले होते. वैद्यकीय पुरावाही महत्त्वाचा ठरला. बाल लैंगिक कायदा कलम अन्वये आरोपीला सात वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड झाला आहे.या खटल्यात सरकारतर्फे माधुरी देशपांडे, गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे नागेश खिचडे या वकिलांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...