आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ५ जणांवर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित युवतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून रेवणनाथ नेताजी ढेरे, नेताजी ढेरे, धनश्री ढेरे, अविनाश करंडे, नवा ताकमोगे (सर्व रा. कव्हे, ता. माढा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पीडिता एप्रिल २०२२ मध्ये एका कार्यकमाला जाण्यासाठी बार्शीच्या एसटी स्थानकावर गेली. तिथे तिची व रेवणनाथ ढेरे याच्याशी ओळख झाली. रेवणनाथने पीडितेशी जवळीक वाढवली व लग्नाचे आमिष दाखवले. लॉजवर नेऊन बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार देऊन शिवीगाळ करत धमकी दिली. पीडितेला त्याने मारहाण देखील केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.