आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा श्रावणात चांगला पाऊस:बाजारात तेजी मंदी आणि 12 राशीचे भविष्य कसे असेल जाणून घ्या...

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा श्रावण महिना सर्व राशीसाठी आनंददायी अन् काही राशीसाठी संमिश्र असणार आहे. अशी माहिती दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे.

मेष - राशीतील मंगळ, हर्षल सुरुवातीस मोठे प्रतिकूल. अपघातापासून सावध रहा. पौर्णिमेजवळ नोकरी व्यावसायिक तणाव. उत्तरार्धात शुक्रभ्रमण अतिशय शुभफळे देईल. नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. वास्तुचिंता मिटेल.

वृषभ - सुरुवातीस ग्रहयोग अनपेक्षित घटनांतून त्रस्त करणारे. व्यावसायीक कामगारपीडा. क्वचित पितृचिंता. बाकी उत्तरार्ध गुरू, शुक्र शुभयोगातून वैयक्तिक भाग्योदयाचा. धनलाभ. शैक्षणिक यश. अमावास्या वाहनपीडेची.

मिथुन - पूर्वार्ध शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर झळा पोहोचवणारा. व्यावसायिक उधारीतून त्रास. पौर्णिमेजवळ मोठे खर्च. उत्तरार्धातील बुध, शुक्रांची भ्रमणं आर्थिक उत्कर्षाची. अमावास्या विचित्र प्रवासाची.

कर्क राशी- मंगळ, हर्षल आणि शनीतील योग आपणास लक्ष्य करतील. पौर्णिमेच्या आसपास अपघातापासून जपा. उत्तरार्धातील गुरू, शुक्र शुभयोग भूतकाळातील अपयश धुवून काढणारा. घरात मोठे प्रसन्न वातावरण राहील. प्रेमिकांचे विवाहयोग.

सिंह - पूर्वार्धात संशयास्पद आर्थिक व्यवहारांतून चिंता. पौर्णिमेजवळ ग्रहांचे मोठे कुयोग. कोर्टप्रकरणांतून त्रास. कर्जप्रकरणांतून त्रास. उत्तरार्धात थोरामोठ्यांच्या मध्यस्थीतून लाभ. अमावास्येजवळ वाहन सांभाळा.

कन्या - पूर्वार्ध शुभ. व्यावसायिक प्राप्तीचे रेकॉर्ड मोडाल. पौर्णिमेजवळील कुयोग प्रिय व्यक्तींच्या चिंतेचे. उत्तरार्ध शुभयोगातून नोकरी / व्यावसायिक सुंदर पर्व सुरू करणारा. अमावास्या प्रवासात बेरंगाची.

तूळ - मोठ्या ग्रहांचे कुयोग प्रत्यक्ष रोख ठेवतील. सर्वबाबतीत दक्षता घ्या. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. पौर्णिमा त्रासदायक. उत्तरार्ध नोकरीत शुभ. काहींना परदेशी व्यापारांतून लाभ. अमावास्या दुखापतीची.

वृश्चिक - महिन्यातील शुभ संबंधित रास राहील. मात्र मध्यस्थीचे व्यवहार टाळा. सरकारी नियम पाळा. उत्तरार्ध तरुणांना सर्व बाबतीत चांगला. अमावास्या राजकीय शत्रुत्वाची.

धनु - पूर्वार्धात वैद्यकीय खर्च. पौर्णिमा संमिश्र स्वरूपाची फळे देईल. उत्तरार्ध मोठा प्रवाही. महत्वाची कामे. नोकरीत प्रशंसा वा मानांकन. कर्जवसूली. पुत्रपौत्रांचा भाग्योदय. अमावास्या प्रवासात बेरंगाची.

मकर - पौर्णिमेजवळ वादात ओढले जाल. घरात विरोध होईल. उत्तरार्धात शुभ ग्रहयोगातून एखादे संकट टळेल. वैवाहिक जीवनातून मोठा दिलासा. मात्र मोठ्या ग्रहांच्या कुयोगांतून झळा पोहोचवणारा. अमावास्येजवळ दुखापती जपा.

कुंभ - पौर्णिमेपर्यंत कुयोगांचा भर राहील. नोकरीत वरिष्ठांचा जाच राहील. गुप्तचिंता ग्रासून राहील. नवपरिणीतांना त्रास होईल. पौर्णिमेनंतर आर्थिक संकट टळेल. अमावास्येजवळ बदलीचे योग.

मीन - कुयोगांच्या पार्श्वभूमीवर गुरुभ्रमणाचे पाठबळ प्रचंड राहील. आरोग्यविषयक पथ्ये पाळा. कुसंगत टाळा. जुगारसदृश्य व्यवहार टाळा. उत्तरार्धात मोठे लाभ. खरेदीविक्रीचे व्यवहार. व्यावसायिक नवे उत्तम पर्याय. असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...