आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वार्षिक उत्पन्न 59 हजार असेल तर रेशन बंद ; स्वत: पुढे येण्याचे आवाहन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारचाकी, दुचाकी, बागायत असलेल्या सधन कुटुंबीयांनी रेशन धान्य घेण्याचे सोडून द्यावे, असे आवाहन सार्वजनिक पुरवठा खात्याकडून केले जात आहे. इतकेच नव्हे तर शहरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार म्हणजेच ४ हजार ९१० रुपये मासिक असलेल्यांनाही धान्य सोडून देण्यासाठी सांगितले जात आहे.

ग्रामीण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार म्हणजेच मासिक उत्पन्न ३ हजार ६६६ रुपये असलेल्यांनीही धान्य घेणे सोडून द्यायचे आहे. शहरातील सधन लाभार्थीकडून प्रतिसाद मिळत नाही. पुरवठा विभागाकडून करण्यात येत असलेल्या पडताळणीमध्ये कुटुंब असल्याचे सधन आढळून आल्यास गुन्हा दाखल करून बाजारभावानुसार वसुली करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी शहर, ग्रामीणमध्ये २०२ जणांनी अर्ज दिला आहे.

पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी शहरातील परिमंडळ अ, ब, क, ड या चारही विभागात अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. १९ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार सधन ग्राहकांकडून अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी आढावा घेत दुकानदारांना प्रचार करण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीत शहरातील ३६ जणांनी ‘गिव्ह इट अप’चा अर्ज भरून दिला. सधन कार्डधारकांची यादी दुकानदारांनी द्यायची आहे. यादीतील कुटुंबांची पडताळणी करून त्या कार्डधारकांचे धान्य बंद करण्यात येणार आहे.

प्रधान सचिवांकडून कौतुक
सोलापूर जिल्ह्यात गिव्ह इट अप योजनेच्या होत असलेल्या अंमलबजावणीबाबत पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे व कर्मचाऱ्यांचे मुख्य सचिव विजय वाघमारे यांनी कौतुक केले आहे. हे अभियान पुणे विभागात राबवण्यात येणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.

सप्टेंबरपर्यंत किती अर्ज येतात? हे पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पण आता सध्याची स्थिती पाहता शहरात १० हजार तर ग्रामीणमध्ये ५० हजारहून अधिक जणांनी स्वत:हून अर्ज भरतील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक दुकानातील कार्डधारकांच्या यादीनुसार पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.’’ वर्षा लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी

बातम्या आणखी आहेत...