आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:बार्शी तालुक्यात भाजपच्या राऊत गटाची सरशी ; ग्रामपंचायतीत संमिश्र कौल

बार्शी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा राऊत गटाची सरशी झाली आहे. तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीवर भाजपा (राऊत गट) ने तर ५ ग्रामपंचायतीवर माजी मंत्री सोपल गटाने (शिवसेना ठाकरे गट) निर्विवाद वर्चस्व मिळवले. ग्रामपंचायतीत संमिश्र कौल असून तिन्ही गावच्या सरपंचपदावर सोपल गटाचे उमेदवार विजयी झाले. तर सदस्यसंख्येत राऊत गटाकडे बहुमत आहे. उर्वरीत दोनपैकी मांडेगांव अपक्ष आहे तर रस्तापूर विजयी गटाने ते कोणाकडे आहेत याचा कौल स्पष्ट केला नाही.

सरपंचपदाचा विचार केला तर २२ पैकी १२ िठकाणी भाजपाचे, ८ ठिकाणी माजी मंत्री सोपल शिवसेना ठाकरे गटाचे तर सदयस्थितीत २ ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. माजी मंत्री सोपल यांच्या येळंब गावात सरपंचपदी सोपल गटाचा तर बहुमत राऊत गटाकडे आहे. राजेंद्र मिरगणे यांच्या मांडेगांवमध्ये त्यांच्या समर्थकाच्या पत्नीचा सरपंचदपदी पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...