आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावजी सखाराम शाळेला अटल टिंकरिंग लॅब:केंद्र सरकारकडून​​​​​​​साठी 20 लाखांचे अनुदान, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होणार

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून अटल टिंकरिंग लॅब उपक्रमातून वीस लाखाचे अनुदान प्राप्त झाले आहे.

पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अटल टिंकरिंग लॅबचा चा शुभारंभ उद्योजक संजय शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, केतन शहा, संतोषभाभी बंब, श्रीनिवास सरवदे, प्राचार्य संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

संजय शहा म्हणाले की माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी केंद्र सरकारचा हा उपक्रम दिलासादायक आहे. अटल टिंकरिंग म्हणजे विज्ञानाची प्रयोगशाळा असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिकता येणार आहे . विद्यार्थांना वैज्ञानिक होण्याचा मार्ग सुखकर होणार आहे असा विश्वास संजीव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मोहिते यांनी केले. सूत्रसंचलन अण्णा दीक्षित यांनी केले तर आभार संतोष वालवडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी वसंत नागणे, गजानन गोरे, महावीर आळंदकर यांनी प्रयत्न केले.

अनुदान मिळवणारे एकमेव हायस्कूल

अटल टिंकरिंग लॅब हा केंद्र सरकारचा उपक्रम असून त्यासाठी अनुदान मिळवणारे रावजी सखाराम हायस्कूल हे शहरातील हे एकमेव हायस्कूल आहे. या योजनेमुळे परिसरातील शाळांना सुध्दा या लॅबचा लाभ घेता येणार आहे व ते विद्यार्थी देखील विज्ञाननिष्ठ होतील असे मुख्याध्यापक संजय मोहिते यांनी प्रास्ताविकात सांगितले.

अटल टिंकरिंग लॅब मधील प्रयोग

रावजी सखाराम हायस्कूलमध्ये भव्य प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली असून या लॅब मध्ये विद्यार्थांना ड्रोन, थ्रीडी प्रिंटर च्या माध्यमातून प्रिंटिंग, रडार तंत्रज्ञान असे वैज्ञानिक प्रयोग करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी शिक्षक संतोष वालवडकर आनंदकुमार मुरूमकर अण्णा दीक्षित गजानन गोरे मार्गदर्शन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...