आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:दोघांची नीट परीक्षा पुन्हा घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, सोलापुरमध्ये चुकीच्या कोडच्या उत्तरपत्रिका पुरविल्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट परीक्षेवेळी सोलापुरातील केंद्र निरीक्षकांकडून चुकीचे टेक्स्ट बुकलेट आणि उत्तरपत्रिका पुरवण्यात आल्या होत्या. याविरुद्ध दोन विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका ग्राह्य धरून या दोघांची फेरपरीक्षा घेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. यामुळे या परीक्षेचा निकाल आणि यासोबतच वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

याचिकाकर्ते वैष्णवी भोपळे व अभिषेक कापसे या विद्यार्थ्यांची नीट परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. दोन दिवसांत या फेरपरीक्षेची तारीख व परीक्षा केंद्र निश्चित करून हायकोर्टाला कळवायचे आहे. १२ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा झाली. या परीक्षेत १६ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.

पर्यवेक्षकांनी वैष्णवीला कोड चारची टेस्ट बुकलेट व कोड पी-४ ची उत्तरपत्रिका दिली. तर अभिषेकला कोड पी-४ चे टेक्स्ट बुकलेट व कोड चार अशी उत्तरपत्रिका मिळाली. थोडक्यात एक प्रश्नपत्रिका व दुसऱ्याची उत्तरपत्रिका अशी अदलाबदल या दोघांत केंद्र निरीक्षकांच्या चुकीने झाली होती.

बातम्या आणखी आहेत...